Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीअलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अलर्ट कधी जारी केले जातात?

अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अलर्ट कधी जारी केले जातात?

मुंबई : हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पण अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? तुम्हाला माहिती आहे का? हवामान खात्याकडून अलर्ट कधी जारी केले जातात? एकूण किती प्रकारचे अलर्ट असतात? आणि या अलर्टचा नेमका अर्थ काय असतो?

एकूण चार प्रकारचे अलर्ट असतात.

  • १. ग्रीन अलर्ट
  • २. येलो अलर्ट
  • ३. ऑरेंज अलर्ट
  • ४. रेड अलर्ट

ग्रीन अलर्ट : पावसादरम्यान जेव्हा परिस्थिती सामान्य असते तेव्हा ग्रीन अलर्ट हवामान खात्याकडून दिला जातो. या दरम्यान कुठलेच निर्बंध नसतात.

येलो अलर्ट : येणाऱ्या दिवसांमध्ये नैसर्गिक संकट येऊ शकतात तर यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

ऑरेंज अलर्ट : कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता जेव्हा असते तेव्हा ऑरेंज अलर्ट दिला जातो. त्याचप्रमाणे नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, अशी सुचना या अलर्टद्वारे दिली जाते. वाहतूक ठप्प होणे यासारख्या समस्या देखील ऑरेंज अलर्टचा एक इशारा असतो.

रेड अलर्ट : रेड अलर्ट हे मोठे संकटाची चेतावणी असते. मोठे नुकसान होण्याची शक्यता या अलर्टमधूव वर्तवली जाते. तसेच नागरिकांनी स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असा या अलर्टचा अर्थ असतो.

हाय अलर्ट?

अलर्ट म्हणते कुठल्याही क्षणी तत्पर राहाणे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तिच्याशी झूंज द्यायला कधीही तयार असणे.

खरे तर हाय अलर्ट असा काही शब्दच अस्तित्वात नाही. हाय अलर्ट हा शब्द काही वरिष्ठ अधिका-यांच्या माध्यमातून मीडियावाल्यांनी पसरवलेला शब्द आहे.

मच्छीमार पावसाळ्यात जेव्हा समुद्रामध्ये जातात, तिथे समुद्रात वाऱ्याचा वेग, वादळाची शक्यता, लाटांची उंची अशा गोष्टींची सूचना ते वेगवेगळ्या रंगाची निशाणी (कंदील – दिवे – झेंडे) लावून ते इतरांपर्यंत पोहोचवतात. त्यामध्ये विविध रंग आहेत, पण हाय अलर्ट हा शब्द आपण ज्या संदर्भात वापरतो त्यामध्ये असा थेट अर्थ नाही.

दहशतवाद या संज्ञेचा संदर्भ देऊन जेव्हा आपण हाय अलर्ट जारी असे म्हणतो, तेव्हा त्या घटनेचा परिणाम अधिक जाणवावा या कारणासाठी वापरण्यात येणारी ही संज्ञा असते याचा उद्देश प्रथम आपण लक्षात घ्यायला हवा.

शासकीय भाषेमध्ये कोणीच हाय अलर्ट हा शब्द कागदोपत्री वापरत नाही. एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्यानंतर सगळ्या ठिकाणी अलर्ट पाठवण्यात येतो. रेल्वे स्टेशन, मॉल, मल्टिप्लेक्सेस, हॉस्पिटल्स अशा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात येते. बॉम्ब किंवा दहशतवादी या संबंधी काहीही अलर्ट आला की जीवितहानी होऊ नये म्हणून जास्तीत जास्त दक्ष राहून काळजी घेतली जाते. त्यानुसार उपाययोजना करतो. या संपूर्ण प्रक्रियेला आपण हाय अलर्ट किंवा रेड अलर्ट अशा संज्ञा वापरायला लागलो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -