मुंबई : राज्यात मुंबई, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, नागपूरसह सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढील काही तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
यंदा उशीरा पावसाला सुरुवात झाली असली तरी आता कोकण किनारपट्टी भागात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सध्या मुंबईतील दादर, सायन, वरळी या शिवाय उपनगरीय भागात धो-धो पाऊस पडत आहे. ठाण्यापासून पुढे कल्याण तसेच अंबरनाथपर्यंत धुवांधार पाऊस सुरु आहे. नवी मुंबईतही जोरदार पाऊस सुरु असून लोकल जवळपास २० ते ३० मिनिटे उशीराने सुरु आहेत. वाशी, बेलापूर, खारघर, पनवेल परिसरात धुवांधार पाऊस कोसळला.
मागील काही तासांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस झाला. याशिवाय पुढील काही तासांत हा पाऊस आणखी वाढू शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…