मुंबई : राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्षात रविवारी विधानसभेचे अध्यक्षपद जिंकलेल्या शिंदे-भाजपा सरकारने दणदणीत विजय मिळवला आहे. आज विधासभेत बहुमत प्रस्तावही १६४ मतांनी जिंकला. दरम्यान, यापूर्वीच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले.
कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात शक्तिप्रदर्शन करणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात सामील झाले आहेत. संतोष बांगर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रात्री संतोष बांगर यांना फोन आला होता. मुख्यमंत्र्यांकडून मनधरणी झाल्याने बांगर शिंदे गटात सामील झाले, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.