सेवामुक्तीनंतरही अग्निवीरांना मिळणार निःशुल्क उपचार

  83

नवी दिल्ली (हिं.स.) : केंद्र सरकारने या अग्नीवीरांसाठी आणखी एक सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या अग्नीवीरांना २३ व्या वर्षानंतर सैन्यदलांतून सेवामुक्त झाल्यावरही मोफत उपचार करण्याचा प्रस्ताव जाहीर करण्यात आला आहे.


योजनेला झालेला हा विरोध पहाता केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने दिलासा देणाऱ्या घोषणा सुरू केल्या आहे. निमलष्करी दलांमध्ये, राज्यांच्या पोलिस दलांमध्ये ७५ टक्के सेवामुक्त अग्नीवीरांना राखीव जागा ठेवण्याच्या घोषणा टप्प्याटप्याने करण्यात आल्या आहेत.


याच दरम्यान हवाई दलाने त्यांच्या कोट्यातील ३ हजार अग्नीवीरांची ऑनलाईन भरती मोहीम सुरू केली. पहिल्या केवळ ६ दिवसांत हवाई दलाकडे तब्बल २ लाखांहून जास्त तरूणांनी अर्ज केले. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाकडून अग्नीवीरांसाठी एका नवीन सवलतीची घोषणा आज करण्यात आली.


त्यानुसार सेवाकाळात जखमी झालेल्या व दीर्घ उपचारांची गरज असलेल्या अग्नीवीरांना सेवामुक्त केल्यावरही मोफत उपचारांची सुविधा कायम ठेवण्यात येणार आहे. योग्यता व कामगिरीच्या आधारावर लष्करी सेवेतून ४ वर्षांनी मुक्त केले जाणा-या ७५ टक्के तरूणांना जे ११.७१ लाख रूपयांचे सेवा निधी पॅकेज मिळणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त हे मोफत उपचार असतील असेही स्पष्ट करण्यात आले.


संबंधित अग्नीवीर गंभीर जखमी झाले असतील व त्यांना दीर्घ उपचारांची गरज असेल त्यांच्यावर त्या कालावधीत लष्कराच्या नियमांनुसार सैन्यदलांच्या रूग्णालयांत उपचार करण्यात येतील. सेवाकाळात गंभीर जखमीझाल्यास १५ लाखांपासून ४४ लाखांपर्यंत भरपाई देण्याची तरतूद मूळ योजनेत यापूर्वीच करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तानची हवाई क्षेत्रं २४ सप्टेंबरपर्यंत एकमेकांसाठी बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी

कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुंचे निधन

मऊ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचे अपघाती निधन झाले. ते मऊ कुशीनगर,

अनिल अंबानी पुन्हा अडचणीत, ईडीनंतर अंबानींच्या सहा ठिकाणांवर सीबीआयचे छापे

अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकल्यानंतर आता सीबीआयने देखील उद्योगपती

Online Gaming Regulation Act जाहीर झाल्यावर ड्रीम ११ ची मोठी घोषणा! आता जिंकल्यावर पैशांऐवजी मिळणार...

नवी दिल्ली: 'ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५' ला राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता

Online Gaming Regulation Bill 2025: ऑनलाइन गेमिंगवर अखेर बंदी; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारने ऑनलाइन मनी गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक मांडले होते. लोकसभा आणि

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन

नवी दिल्ली : महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम येथे सुरू असलेल्या गणेशमूर्ती