हैदराबाद : हिंदूंव्यतिरिक्त अन्य समुदायांमध्ये देखील वंचित आणि दलित वर्ग आहेत. आपण केवळ हिंदूंपुरते मर्यादित न राहता या सर्व वंचित समाजासाठी काम केले पाहिजे. त्यामुळे अन्य वंचित आणि दलित समुदायापर्यंत पोहोचावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे नेते आणि पदाधिकारी यांना केले आहे. हैदराबादमधील भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते.
मोदी म्हणाले की, भाग्यनगरमध्येच सरदार पटेलांनी ‘एक भारत’चा नारा दिला होता. आम्ही तुष्टीकरण संपवून तृप्तीकरणाचा मार्ग स्वीकारला आहे. आमची एकच विचारधारा आहे, नेशन फर्स्ट. आमचा एकच कार्यक्रम आहे, नेशन फर्स्ट’.
आमची विचारसरणी लोकशाहीची आहे. जेव्हा पीएम म्युझियम बांधले गेले तेव्हा आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांना तिथे जागा दिली. आमच्यावर अत्याचार करणाऱ्या अशा पंतप्रधानांचाही त्यात समावेश असल्याचेही मोदी म्हणाले.
अनेक राजकीय पक्ष आपले अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ही घसरण आपल्यासाठी उपहासाची किंवा विनोदाची बाब नाही. आपण शिकले पाहिजे की त्याने केलेल्या कोणत्याही गोष्टी करण्याची आपल्याला गरज नाही, असेही ते म्हणाले.
तेलंगणामध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संघटित पद्धतीने आयोजित करण्याच्या प्रयत्न उल्लेखनीय आहेत. सर्व प्रतिकूल परिस्थिती असतानाही भाजपा आणि त्यांची दृष्टी सामान्य माणसांपर्यंत नेण्याच्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. अनेक राज्यांमध्ये कार्यकर्ते सत्तेशिवाय काम करत आहेत. बंगाल, केरळ, तेलंगणामध्ये हे घडत आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…