अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा कट उधळला, दोन दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली (हिं.स.) : दोन वर्षांच्या कालखंडानंतर अमरनाथ यात्रा यावर्षी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. या यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार जम्मू काश्मीरमधील तुकसानमध्ये 'लष्कर ए तोयबा'च्या फैजल अहमद डार आणि तालिब हुसेन या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या दोघांच्या अटकेमुळे दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळण्यात आला असून सुरक्षा यंत्रणांसाठी हे मोठे यश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी फैजल हा लष्कर ए तोयबाचा पहिल्या फळीतील दहशतवादी आहे. दोघांकडून दोन एके-४७ (AK-47) रायफल, ७ ग्रेनेड आणि एक पिस्टल जप्त करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांना पकडून देणाऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी दोन लाख, तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ५ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. अधिक चौकशीत पोलिसांना अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याची या दहशतवाद्यांची योजना असल्याची माहिती समोर आली.


जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर हा हल्ला होणार होता. पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये तालिब हुसेनचा या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. तालिबने यापूर्वी राजौरीमध्ये दोन बॉम्बस्फोटाची चाचणी घेतली होती. त्याने फैजलशी संपर्क साधला होता. त्यानंतर हे दोघे तुकसान जिल्ह्यातील गावात लपून बसले होते. त्यांनी पुढील हालचाल करण्यापूर्वीच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना अटक केली.

Comments
Add Comment

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा