मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना महाविकास आघाडी आणि भाजापा-शिंदे गटाकडून एकमेकांना जोरदार टोलेबाजी केली.
अजित पवारांनीही मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंना टोला लगावला होता. यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही अजित पवारांना प्रतिउत्तर दिले आहे.
अजित पवार म्हणाले की, “एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितले असते की अडीच वर्ष झालीत, आता मला मुख्यमंत्री बनायचे आहे. तरी उद्धव ठाकरेंना सांगून तुम्हाला तिथे बसवले असते”. असा टोला लगावला होता. त्यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांनीही प्रतिउत्तर दिले आहे. “अजित दादा जर तुम्हाला वाटले मुख्यमंत्री व्हावे तर मी सांगतोय आमच्या कानात येऊन सांगा”, असा खोचक टोला मुनगंटीवारांनी लगावला आहे.
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…