पुणे (प्रतिनिधी) : गेल्या वर्षीच्या तुलनते यंदा पाऊसमान चांगले असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानुसार, जून महिन्याच्या मध्यापासून महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी सुरु झाल्या. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. यंदा जून महिन्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यातच मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी राज्यात कोकणातील काही जिल्ह्यांना अलर्ट आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला होता.
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पावसाच्या या सरी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत कोसळणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यावर्षी मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे. आता पावसाने जोरदार बरसावे, म्हणजे शेतीकामांना वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.राज्यात २६ जूनपासून पावसाला सुरुवात होईल अशी माहिती हवामान खात्याने आधी दिली होती. त्याप्रमाणे काही ठिकाणी पावसाने सुरुवात केली. मात्र कोकणचा काही प्रदेश वगळता राज्यातील इतर भागात पावसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे.
तथापि, जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.गेल्या वर्षीच्या तुलनते यंदा पाऊसमान चांगले असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यानुसार, मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी सुरु आहेत. मात्र या पावसाचा जोर कोकणातील प्रदेशावर अधिक असल्याचे चित्र आहे. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे.