‘तुम्ही करोडो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत’ पंतप्रधान मोदींकडून मितालीला शुभेच्छा

नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज हिने काही दिवसापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मितालीच्या क्रिकेटमधील कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


मिताली राजने तिच्या ट्विटर हँडलवरून एक पत्र शेअर करत स्वत: पंतप्रधान मोदींचे आभार मानले. 'आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एवढे प्रेम, प्रोत्साहन मिळणे ही सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. नरेंद्र मोदी हे माझ्यासह लाखो लोकांसाठी आदर्श आणि प्रेरणा आहेत. त्याच्या प्रोत्साहनपर शब्दांनी मी भारावून गेली आहे', असे मितालीने ट्वीट केले.


https://twitter.com/M_Raj03/status/1543140015970127873

पीएम मोदींनी पत्रात लिहिले आहे की, काही आठवड्यांपूर्वी तुम्ही क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन लाखो चाहत्यांना नाराज केले. ज्या करोडो लोकांसाठी तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व केलेत, त्यासाठी मी शुभेच्छा देतो. तुम्ही करोडो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहात. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकात कोविड-१९ च्या प्रतिकूल परिस्थितीत लोकांना मदत केल्याबद्दल तुमचे कौतुक वाटते. याशिवाय इतर अनेक सामाजिक कार्यातही तुम्ही सहभाग घेतला आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

Comments
Add Comment

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ

पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा