Sunday, July 6, 2025

वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू

भंडारा : वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे घडली.


नांदेड येथे गावालगत शेतशिवारात सुरेश हरीजी साठवणे यांची बैल जोडी झाडाखाली बांधली असताना अचानकपणे वीज कोसळून बैल जोडी जागीच ठार झाली.


यामुळे शेतकऱ्याचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी या शेतक-याने मागणी केली आहे.


दरम्यान, ऐन शेतीच्या हंगामात बैल मरण पावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा