नुपूर शर्मांनी देशाची माफी मागावी- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबराच्या संदर्भात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर देशातील वातावरण बिघडले. तुम्ही माफी मागण्यास उशीर केल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. यावेळी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना देखील खडे बोल सुनावले.


याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना म्हटले की, तुम्ही स्वत: वकील असूनही बेजबाबदारपणाचे वक्तव्य केले आहे. सत्तेची हवा डोक्यात शिरता कामा नये. ज्या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात नुपूर शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदकाने भडकवण्याचे काम केले तर त्यांच्या विरोधात गु्न्हा दाखल का करू नये..? असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला आहे.


दिल्ली पोलिसांना खडसावताना न्यायालय म्हणाले की, नुपूर शर्मा यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांमध्ये पहिल्यांदा एफआयआर नोंदवण्यात आला. मग, त्याविरोधात तुम्ही कारवाई का केली नाही..? असा सवाल न्यायालयाने केला.


या सुनावणी दरम्यान, नुपूर शर्मा यांचे वकील अॅड. मनिंदर सिंह यांनी सांगितले की, टीव्हीवर काही पॅनलिस्ट वारंवारपणे शिवलिंगाबाबत अपमानास्पद वक्तव्ये करत होते. नुपूर शर्मा यांचा कोणत्याही धर्माचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. कोर्टाची ही भूमिका असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असेल असे सिंह यांनी म्हटले. तर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत काही जबाबदारीदेखील असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. एकच एफआयआर योग्य ठरवायचे असल्यास हायकोर्टात दाद मागा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. दिल्लीतील एफआयआरचे काय झाले, असा प्रश्न करताना दिल्ली पोलिसांनी तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरले असावे, अशा शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.


दरम्यान, नुपूर शर्मा यांनी यापूर्वीच आपल्या वक्तव्यावर ट्विट करत खेद व्यक्त केला आहे. कुणालाही दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले. 'मी रागात काही गोष्टी बोलले. भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द परत घेते. माझ्या लाडक्या शिवाचा अपमान होत होता. वारंवार होणारा अपमान सहन होत नव्हता, अशा शब्दात त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती.

Comments
Add Comment

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान

Apple Event 2026 : ॲपलचा भारतात महाधमाका! आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली 'MacBook Pro 2026' लाँच; कधी सुरु होणार प्री ऑर्डर ?

मुंबई : टेक विश्वातील दिग्गज कंपनी अ‍ॅपलने (Apple) भारतीय बाजारपेठेत आपले सर्वात शक्तिशाली लॅपटॉप MacBook Pro (2026) अधिकृतपणे

PM Modi : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची ओमान, कतारच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर पश्चिम आशिया प्रदेशातील परिस्थिती झपाट्याने

Iran Israel War : युद्धाच्या सावटाखालील मराठी नागरिकांसाठी मुख्यमंत्री मदतीला धावले; विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन जारी

परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास अलर्ट मोडवर मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर,