जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ

भुवनेश्वर (हिं.स.) : ओडिशातील सुप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला आज, शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. ही रथयात्रा १ ते १२ जुलै दरम्यान चालणार आहे. ओडिशातील पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेसाठी पूजा विधी सुरु झाली आहेत.


कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा भाविकांना थेट रथयात्रेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुरी मंदिर ते रथयात्रा मार्ग आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सध्या कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यात्रेतील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.


तब्बल दोन वर्षांनी या यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने या ठिकाणी लाखोंची गर्दी जमणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सकाळी 'पहिंद विधि' केला. या विधीमध्ये रथयात्रा सुरू होण्यापूर्वी सोन्याचा झाडूने रथ साफ केला जातो. त्यानंतर भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचा रथ जमालपूर परिसरातील ४०० वर्ष जुन्या जगन्नाथ मंदिरातून वार्षिक यात्रेसाठी रवाना होतो.


जगन्नाथ पुरीप्रमाणेच अहमदाबादमध्येही भगवान जगन्नाथांची १४५वी रथयात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेत भगवान जगन्नाथ, त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्यासह शनिवारी नगर यात्रेला रवाना होणार आहेत. जुन्या अहमदाबादमध्ये होणारी ही नगर यात्रा १९ किलोमीटरची असेल. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे रथयात्रेत प्रथमस्थानी १७ हत्ती, १०१ ट्रक सहभागी होतात.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व