Sunday, July 6, 2025

नारायण राणेंचे भाकीत खरे ठरले!

नारायण राणेंचे भाकीत खरे ठरले!

मुंबई : भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जूनमधील वादळात महाविकास आघाडी सरकार कोसळून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होतील, असे भाकीत १९ एप्रिल रोजी वाशीम दौऱ्यात केले होते.


मागील अनेक महिन्यांपासून भाजपा नेते सरकार पडण्याची डेडलाईन देत होते. त्यामुळे अनेकदा भाजपा नेत्यांची खिल्ली उडवण्यात आली. मात्र भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी १९ एप्रिल रोजी एक विधान करत मविआ सरकार पडण्याची जूनची डेडलाईन दिली होती. राणेंचे ते भाकीत तंतोतंत खरे ठरले आहे.


नारायण राणे म्हणाले होते की, आमच्याकडे कोकणात मे अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक वादळे येतात. या वादळांत डुलणारी झाडे फांद्यांसकट मोडून पडतात. राज्यातही तीन पक्षांचे एक झाड आहे, त्याच्या फांदीवर मुख्यमंत्री बसले आहेत. ते खोडावर बसले नाहीत, यामुळे जूनपूर्वीच ते मुख्यमंत्री पदावरून बाजूला होतील, असे वक्तव्य राणे यांनी केले होते. २ महिन्यात राजकीय चक्रे वेगाने फिरली आणि राज्यात सत्तांतर घडून आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा