फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले असून भाजपच्या गोटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भाजप नेत्यांनी बुधवारी रात्री बंदद्वार बैठक होऊन त्यात देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भात गुरुवारी पुन्हा फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक होणार असून त्यात नेता निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.


यासंदर्भात भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होऊन त्यात नेता निवडीवर शिक्कामोर्तब होईल. तसेच एकनाथ शिंदे गटाशी भाजप सत्ता स्थापनेसंदर्भात वाटाघाटी करणार आहे. सत्ता स्थापनेचा दावा करायचा की, राज्यपालांच्या आमंत्रणाची प्रतिक्षा करायची याचा निर्णय देखील बैठकीत होणार आहे.


दरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासोबतच विधान परिषद सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यांसदर्भात अद्याप निर्णय झाला नसून त्याबाबत येत्या दोन दिवसात चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला