कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुलगाममधील नौपोरा-खेरपोरा, त्रुब्जी भागात ही चकमक झाली. मारले गेलेले दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे.


गुप्तचर यंत्रणेकडून सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडून जवळपास १५० दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय ५०० ते ७०० इतर दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तेथे सुरू असून, हे दहशतवादी ११ प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दल दक्ष आहेत.


सैन्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न यशस्वी झालेला नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी आधीच अवलंबलेल्या मार्गांव्यतिरिक्त इतर मार्गही शोधत आहेत. नियंत्रण रेषेजवळील मानसेरा, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे ११ प्रशिक्षण शिबिरांमध्ये ५०० ते ७०० लोक दहशतवादाचे प्रशिक्षण घेत आहेत.

Comments
Add Comment

फ्लाइट टिकट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली