मतदारांची नावे तपासण्यासाठी ट्रू-व्होटर ॲप

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील विविध १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यातील मतदारांची नावे तपासण्याची आणि हरकती दाखल करण्याची सुविधा ट्रू- व्होटर मोबाइल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सोमवारी येथे दिली.


मदान यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. त्यावर १ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.


प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिकेत किंवा त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यात आपले नाव तपासता येईल. ती सुविधा आता ट्रू-व्होटर मोबाइल ॲपमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विधानसभा मतदारसंघाची यादी प्रभागनिहाय विभाजित करताना त्यात नवीन नावांचा समावेश करणे किंवा नावे वगळण्याचा राज्य निवडणूक आयोगाला अधिकार नाही. एखाद्या मतदारास चुकीचा प्रभाग वाटप झाल्यास किंवा विधानसभेच्या मतदार यादीत नाव असूनही महानगरपालिकेच्या मतदार यादीत नाव नसल्यास, हरकत दाखल करता येते. या हरकतींचा लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने एक नमुना अर्ज तयार केला आहे. त्याद्वारे आपण हरकत घेऊ शकतो आणि ट्रू-व्होटर मोबाइल ॲपद्वारेही सोप्या पद्धतीने हरकत दाखल करता यते, असेही मदान यांनी सांगितले.

Comments
Add Comment

सोमवार आणि मंगळवारी मुंबईत पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई (३) जलवाहिनीवर, अमर महल भूमिगत बोगद्याच्या (१ व २) शाफ्टला जोडणाऱ्या २५०० मिलीमीटर

मुंबईतले रस्ते धुळमुक्त करण्यासाठी 'ही' योजना राबवणार

मुंबई : मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत

धुळ प्रदुषण वाढले, मुंबईतील ५३ बांधकामांना काम थांबवा नोटीस

मुंबई - मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन

पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचा कल ‘जनरल मेडिसिन’ कडे

मुंबई (प्रतिनिधी): देशातील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी २०२५) यंदा विद्यार्थ्यांचा कल एमडी

मल जल प्रक्रिया केंद्रांची कामे जलदगतीने

केंद्र उभारणीच्या कामाच्या कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देश मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत एकूण ७ ठिकाणी मलजल

बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करणार

मुंबई : राज्यात बेकायदेशीर पद्धतीने तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे मिळविलेल्या जन्म-मृत्यू दाखल्यांचे रॅकेट