राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी संसद भवनात अर्ज दाखल केला. सिन्हा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, सपा प्रमुख अखिलेश यादव, द्रमुकचे ए राजा आणि एनसी नेते फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी पक्षनेते उपस्थित होते.


एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या आठवड्यातच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


राष्ट्रपती निवडण्यासाठी १८ जुलै रोजी निवडणूक होणार असून मतमोजणी २१ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीत खासदार आणि आमदारांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजमधील 4,809 सदस्य विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा उत्तराधिकारी निवडतील. लोकसभा आणि राज्यसभेत, तसेच अनेक राज्यांच्या विधानसभांमध्ये भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ पाहता आगामी निवडणुकीत भाजप पक्ष आपल्या उमेदवाराचा विजय सहज सुनिश्चित करण्याच्या स्थितीत आहे.


दरम्यान, रविवारी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा म्हणाले होते, पुढील महिन्यात होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही वैयक्तिक लढतीपेक्षा खूप महत्वाची आहे. सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तींचा प्रतिकार करण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे. माझा मुलगा आणि भाजप खासदार जयंत सिन्हाचा मला पाठिंबा न मिळाल्यामुळं मी कोणत्याही धर्म संकटात नाहीय. माझा मुलगा त्याचा राजधर्म पाळेल आणि मी माझा राष्ट्रधर्म पाळेन.

Comments
Add Comment

वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या एसी लक्झरी कोचची झलक सादर

नवी दिल्ली : इंडो-रशियन संयुक्त उपक्रम काइनेट रेल्वे सोल्युशन्सने बुधवारी राजधानीतील भारत मंडपम येथे आयोजित

बघा, तुम्ही वापरता 'ती' टूथपेस्ट नकली; फॅक्टरीचा पर्दाफाश!

बनावट ENO, Maggi, सिगारेट, कॉस्मेटिक्स नंतर आता कोलगेट, सेन्सोडाईन टूथपेस्टमध्ये भेसळ; ९.४३ लाखांचा साठा जप्त नवी

सुरतमध्ये बनावट कॉस्मेटिक्स फॅक्टरीवर छापा!

सौंदर्य प्रसाधनांमध्ये भेसळ; आरोपी इतर ठिकाणाहून आणत होते कच्चा माल सुरत: सुरत शहरात काही दिवसांपूर्वी नकलांचे

भारताचे अस्त्र क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या विमानांचा वेध घेणार

नवी दिल्ली : डीआरडीओने अर्थात भारतीय संरक्षण संशोधन प्रबोधिनीने अस्त्र क्षेपणास्त्राची आधुनिक आवृत्ती विकसित

बिपिन जोशीची हमास दहशतवाद्यांकडून हत्या

युद्धात ठार झालेला एकमेव हिंदू इस्रायल-हमास युद्धात नेपाळचा तरुण विद्यार्थी बिपिन जोशीला हमासच्या

सुशांत सिंह राजपूतची बहीण बिहारमध्ये लढवणार निवडणूक

देशात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. बिहार विधानसभा निवडणूक २०२५ साठी अनेकांची नावं समोर येत आहेत.