मुंबई : शिवसेनेतील अंर्तगत बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार डळमळीत होण्याची शक्यता असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांनी याबाबत सोशल मीडियातून माहिती दिली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
राज्यात राजकीय नेत्यांना कोरोना होण्याची मालिका सुरूच आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाही कोरोना झाला होता. आता त्यामध्ये अजित पवार यांच्या नावाची भर पडली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच आपल्या कामकाजाला सुरुवात करताना बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अँटिजेन पॉझिटिव्ह आली होती त्यांनतर त्यांची आरटीपीसीआर निगेटिव्ह आली होती.
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…