माफिया सरकारचा अंत जवळ आला; किरीट सोमय्या

मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्र सरकारच्या माफिया सरकारचा अंत जवळ आला असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. तसेच पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरुवात करू या, असे ते म्हणाले.


एकीकडे शिवसेनेमध्ये बंडाळी माजलेली असताना दुसरीकडे भाजपने मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता प्रभाग निहाय बैठक सुरू केल्या आहेत. रविवारी किरीट सोमय्या यांनी घाटकोपरच्या पारशीवाडीमध्ये बैठक घेतली. या वेळी घाटकोपर पश्चिममधील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत बोलताना किरीट सोमय्या यांनी शिवसेना, महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही मला तोतरा म्हणा, टमरेल म्हणा. तुम्ही मला काही म्हणा, पण हिशोब तर द्यावाच लागणार. १९ बंगल्यांच्या घोटाळ्याचा हिशोब घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.


उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत सोमय्या म्हणाले की, मनसुख हिरेनची हत्या ठाकरे सरकारने केली. मलाही मारण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर चार वेळा हल्ला करण्यात आला. कार्यकर्त्यांनी मला वाचवलं. महाराष्ट्र सरकारच्या माफिया सरकारचा अंत जवळ आला आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरुवात करू या.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम