मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना बुधवारी कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना गिरगावातील रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचाराअंती त्यांना आज, रविवारी सकाळी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते राजभवनात दाखल झाले.
राज्यपालांनी ट्विटर संदेशाद्वारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस व रुग्णालयातील इतर कर्मचारी व अधिकारी यांचे आभार मानले आहे.
“आज चार दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आता मी पूर्णपणे स्वस्थ आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दोन दिवस विश्रांती घ्यावी लागेल. सर्व शुभचिंतकांचे याद्वारे मनःपूर्वक आभार मानतो. एच.एन. रिलायन्स हॉस्पिटल येथे उपचार करणारे सर्व डॉक्टर्स – विशेषतः डॉ सम्राट शाह यांचे योग्य निदान तसेच उपचारांसाठी, तसेच डॉ शशांक जोशी व डॉ समीर पगड यांचे वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनासाठी आभार मानतो.
माझी काळजी घेणारे रिलायन्स हॉस्पिटल परिवारातील परिचारिका तसेच इतर सर्व अधिकारी व कर्मचारी बंधु – भगिनी यांचेप्रती मी ऋणनिर्देश व्यक्त करतो,” असे राज्यपालांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…