नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार साजिद मीर याला पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. मुंबई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १६६ लोकांमध्ये सहा अमेरिकन नागरिकांचा समावेश होता. अमेरिकन एजन्सी एफबीआयने मीरला अटक करून दोषी ठरवण्यासाठी ५ दशलक्ष डॉलर पर्यंतचे बक्षीस ठेवले होते.
एफबीआयने मीरला फरार दहशतवादी घोषित केले होते. परदेशी सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्याचा कट रचणे, दहशतवाद्यांना मदत करणे, अमेरिकेबाहेर एका नागरिकाची हत्या करणे आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट करणे या आरोपांवरून अमेरिकच्या तपास यंत्रणेने मीरला फरार दहशतवादी घोषित केले होते.
पाकिस्तान सरकार नेहमीच साजिद मीरबद्दल खोटी माहिती देत आली आहे. पाकिस्तानने नेहमीच साजिद मीरची तिथे असल्याचे नाकारले. पाकिस्तानने तर साजिद मीरचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.