विलास खानोलकर
एकदा श्रीमंत बापूसाहेब बुट्टी शिरडीस आले होते. तेव्हा नाना डेंगळे नावाचे एक ज्योतिषी बुट्टींना म्हणाले, “आजचा दिवस आपल्यासाठी फारच अशुभ आहे. काही तरी गंडांतर येण्याची शक्यता आहे. सावध राहा.” ते ऐकून बापूसाहेब अस्वस्थ झाले. आता आपल्याला कोणत्या संकटला सामोरे जावे लागणार, या विचाराने चिंताग्रस्त झाले. काही वेळाने ते बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत गेले. तेव्हा डेंगळेही तेथेच होते. बुट्टींना पाहून बाबा म्हणाले,“काय रे, आज हा ज्योतिषी नाना तुला काय म्हणाला? तो तुला मारायला उठला आहे काय? पण आपल्याला कसली भीती! त्याला म्हणावं, तू मला कसा काय मारतोस तेच पाहतो.” ते ऐकून बुट्टींच्या मनातील अस्वस्थता कमी झाली. त्यांना मोठा दिलासा मिळाला. बाबांसारखा रक्षणकर्ता आपल्या पाठीशी असताना आपल्याला कसली भीती?
सायंकाळी बापूसाहेब शौचालयात गेले असताना त्यांना एक साप दिसला. त्याला पाहून ते मागे फिरले. त्यावेळी लहानू नावाचा एक शिपाई त्यांच्याबरोबर होता. त्यांनी त्याला काठी आणण्यास सांगितले. इकडे तो साप भिंतीवर चढत असताना तोल जाऊन खाली पडला आणि शौचकुमातून निघून गेला. त्याला मारण्याची आवश्यकताच भासली नाही. बापूसाहेबांना बाबांच्या शब्दांची आठवण झाली.
आज त्यांच्या कृपेनेच आपले गंडांतर टळले म्हणून त्यांनी कृतज्ञतेने नमस्कार केला.
शिर्डी साई वदे भक्ता
बिलकुल घाबरू नको भक्ता ।।१।।
साईभक्त प्रेमळ बुट्टी
घाबरून घेई सुट्टी ।।२।।
कामाशी घेऊन नको कट्टी
संकटाला मारेन मी पट्टी ।।३।।
डेंगळे शास्त्रीचे भविष्य खोटे
साईचे पावित्र्य त्याहूनी मोठे ।।४।
साई सापावर मारेल सोटे
साप पळून जाईल लोटे ।।५।।
याच बुट्टीने बांधला वाडा
तेथूनच चाले साईचा गाडा।।६।।
साईभक्तीने संकटाला गाडा
शिर्डी प्रेमाने शत्रूला नडा ।।७।।
श्रद्धा सबुरीला नको तडा
शिर्डीला साईचा तयार वाडा।।८।।
गरिबांना भाकर-तुकडा वाढा
पशू-पक्ष्यांना पाणीचारा वाढा ।।९।।
मनात जनात माणूसकीचा झरा
प्रेमळ साईभक्तीचा बोध धरा ।।१०।।