मुंबई : शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचल्याचा आनंद शिवसेना खासदार संजय राऊत यांना झाला, असे खोचक ट्विट भाजप नेते नारायण राणे यांनी केले आहे.
संजय राऊत खुश! कारण त्याला शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने, असे राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
तर दुसरीकडे, मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत आदरणीय पवार साहेब यांचं स्वप्न पूर्ण… शिवसेना संपली…? असे म्हटले आहे.
दोघांचे ट्विट पाहता राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मविआ सरकार बरखास्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्यातील घडामोडींना वेग आला आहे.
यापूर्वीही भाजपच्या अनेक नेत्यांनी शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे. असे वक्तव्य केलं होतं.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…