मुंबईवर पाणीकपातीचे संकट

सीमा दाते


मुंबई : जून महिन्याचा तीसरा आठवडा सुरू झाला असला तरी हवा तसा पाऊस पडलेला नाही. यामुळेच मुंबईवर पाणी कपातीचे संकट आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये एकूण साठ्याच्या केवळ १०.४५ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे.


मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्यावर्षी वर्षभर पुरेल असा पाणी साठा होता. मात्र यंदा जून महिन्याचा तीसरा आठवडा सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात धरणक्षेत्रात पाऊस झाला नसल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट आहे. सध्या १०.४५ इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे, तर सर्व तलावांमध्ये १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर पाण्यापैकी १५ हजार १२३ कोटी लिटर म्हणजेच एकूण साठ्याच्या केवळ साडेदहा टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. दरम्यान दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसे झाल्यास मुंबईकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळू शकते.




मुंबईला दररोज अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सर्व धरणांमधून दिवसाला ३८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो.


मुंबईकरांसाठी वर्षभर १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. सध्या या धरणांमध्ये १५ हजार १२३ कोटी लिटर एवढा पाण्याचा साठा शिल्लक आहे.

Comments
Add Comment

मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषणात वाढ

मुंबई (वार्ताहर) : मुंबईतल्या बांधकामांसोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषण वाढत असून, धुके आणि धूलिकणांमुळे यात आणखी भर

महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ च्या तारखेत बदल !

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याकडून आयोजित करण्यात येणाऱ्या ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८

मुंबईतील भायखळा परिसरात मोठा अपघात

मुंबई : मुंबईतील भायखळा परिसरात मोठा अपघात झाला आहे. जे जे हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या एस ब्यु टी क्लस्टर १

आतापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त मृतांचे आधार क्रमांक केले निष्क्रीय

मुंबई : जेव्हापासून आधार आयडी सुरु झाले तेव्हापासून करोडो लोकांचे युआयडीएआयकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. अद्यापही

मुंबईतील दहिसरमध्ये मोठी आग, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे धोका टळला !

मुंबई : राजधानी मुंबईतील दहिसर पूर्वेकडील आनंदनगर परिसरात आज मोठी आग लागली. दहिसर येथील एका उंच इमारतीत ही आग

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून या