ठाकरे सरकारला धक्का महाविकास आघाडीची तब्बल वीस मते फुटली

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा पुन्हा धुव्वा उडवला आहे. राज्यसभा निवडणुकीपेक्षा आणखी दहा मते जास्त मिळवून भाजपच्या पाचही उमेदवारांनी बेगमी केली. भाजपचे ११३ आमदारांचे संख्याबळ असताना ११३ मते मिळवून महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मते आपल्याकडे वळवली.


विधान परिषदेच्या आज झालेल्या मतमोजणीत कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला. राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय यांना भाजपने पहिल्या पसंतीची ३० मते दिली. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांना १७ मते पहिल्या पसंतीची मिळाली. याशिवाय प्रवीण दरेकर यांना २९, उमा खापरे यांना २७ अशी पहिल्या पसंतीची मते मिळाली. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे चारही उमेदवार प्रत्येकी २६ मते मिळवून विजयी झाले. तरी मते फुटल्याचे शल्य या पक्षांना झेलावे लागणार आहे.


शिवसेनेकडे अपक्षांसह पहिल्या पसंतीची सुमारे ६३ मते असताना आणि कॉंग्रेसकडे ४४ असताना कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीची कोट्याइतकी मते मिळू शकली नाही. ही बाब या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक बाब ठरली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रामराजे यांना २९ आणि एकनाथ खडसे यांना २८ मते पहिल्या मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपले उमेदवार सहज निवडून आणले.


शिवेसनेचे सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना कोट्याइतकी म्हणजे प्रत्येकी २६ मते मिळाली. त्यामुळे ते देखील विजयी झाले. पण शिवसेनेच्या उमेदवारांना या पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवणे अपेक्षित होते. कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना २२ व भाई जगताप यांना १९ पहिल्या पसंतीची मते मिळाली. याचा अर्थ कॉंग्रेसकडे ४४ मते असतानाही तीन मते फुटल्याचे दिसून येत आहे.

Comments
Add Comment

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण

Railway News : मोठी बातमी! तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आता 'ओटीपी' बंधनकारक; रेल्वेचा नवीन नियम काय?

मुंबई : रेल्वे प्रवाशांना तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये सुरक्षितता आणि पारदर्शकता मिळावी, यासाठी भारतीय रेल्वेने एक

मुंबईतील सर्वाधिक खोल शहरी बोगद्याचे काम सुरू

‘ऑरेंज गेट टनेल’ जून २०२८ पर्यंत पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; ७०० इमारतींच्या खालून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या