मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक सुरू आहे. सायंकाळी ४ वाजता सर्व आमदारांनी आपले मत टाकले आहे. यानंतर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
राज्यसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांनी आमदार फुटल्याबाबत तीव्र आरोप केले होते. याबाबत विचारले असता हितेंद्र ठाकूर म्हणाले की, या निवडणुकीचा निकाल लागला की कळेल, कोण फुटले आणि कोण नाही, असे सांगत जो निवडणुकीत हरतो, तो असे खापर दुसऱ्यांवर फोडत असतो. आमदार काय मच्छिबाजार वाटला का, अशी विचारणा केली.
तर, तुमच्यात हिंमत असेल, तर सगळ्यांसमोर एकदा काय ते जाहीर करून टाका. संजय राऊत यांनी त्यांना अपेक्षित मते मिळाली नाही, त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. माझ्यावर आरोप केले नव्हते, असे सांगत हितेंद्र ठाकूर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…