Sunday, November 2, 2025
Happy Diwali

मुंबई पोलिसांचा 'संडे स्ट्रीट' उपक्रम

मुंबई पोलिसांचा 'संडे स्ट्रीट' उपक्रम

मुंबई : मुंबई पोलिसांच्या वतीने नरिमन पॉईंट येथे संडे स्ट्रीट उपक्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई शहरातील लोकांना तणावमुक्त वातावरणामध्ये वावरता यावे. त्यांना मनोरंजन, योगा, जॉगिंग, सायकलिंग आणि सांस्कृतिक खेळ यांसारख्या कार्यक्रमांचा आनंद घेता यावा याकरिता मुंबई पोलिसांमार्फत 'संडे स्ट्रीट' संकल्पना राबवण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला आज मरीन ड्राईव्ह येथे अभिनेता अक्षय कुमार, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी अभिनेता अक्षय कुमार म्हणाले, कोविड काळात सर्वत्र शांतता होती. परंतु आता दिसणारे हे चित्र दिलासादायक आहे. संडे स्ट्रीट कल्पना कायम स्वरूपी राबवावी. पोलिसांचे लोकांसोबत संबंध दृढ करण्यासाठी हा चांगला उपक्रम आहे. मुंबईमध्ये आज एकूण १३ ठिकाणी 'संडे स्ट्रीट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या या उपक्रमाचे मुंबईकरांनी स्वागत केले असून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment