भिवंडीत पिण्याच्या पाण्याच्या ४९०० सीलबंद बाटल्या जप्त

भिवंडी (हिं.स.) : बीआयएस अर्थात भारतीय मानके संस्थेने ठाण्यातील भिवंडी येथून पिण्याच्या पाण्याच्या ४९०० सीलबंद बाटल्या जप्त केल्या. या बाटल्यांवर बीआयएसच्या मानक चिन्हाचा बेकायदेशीर वापर केलेला होता. आय एस १४५४३:२०१६ नुसार, ठाण्यात भिवंडी येथे पिण्याच्या पाण्याच्या सीलबंद बाटल्यांवर बीआयएसच्या प्रमाणनाचे चिन्ह बेकायदेशीर पद्धतीने वापरले जात आहे का, याचा तपास करण्यासाठी बीआयएसच्या मुंबई पथकाने भिवंडीत सक्तीचा तपास आणि जप्तीची धाड टाकली.


मेसर्स बालाजी एन्टरप्रायझेस, H.No- 611, वेहेळे, पो.- पिंपळास, माणकोली मार्ग, ता. भिवंडी, जि.ठाणे ४२१३११ मुंबई- ४००७०५ येथे, बीआयएसकडून वैध परवाना ना घेताच बीआयएस प्रमाणन चिह्नाचा बेकायदेशीर वापर करून, बीआयएस कायदा, २०१६ च्या कलम १७ चे उल्लंघन केले जात असल्याचे या धाडीच्या वेळी निदर्शनास आले.


या जप्तीच्या कारवाईच्या वेळी पिण्याच्या पाण्याच्या ५०० मिलीच्या अंदाजे ४९०० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या सीलबंद बाटल्यांवर बीआयएस प्रमाणन चिन्ह अंकित केलेले होते, मात्र ते या कंपनीचे नव्हते, असे आढळून आले. सदर अपराधाबद्दल न्यायालयात खटला भरण्यासाठी पुढील कारवाई करण्यात येत आहे.


ही तपास आणि जप्ती कारवाई बीआयएसच्या अधिकाऱ्यांनी- 'शास्त्रज्ञ-सी तथा उपसंचालक टी अर्जुन आणि शास्त्रज्ञ-बी तथा सहसंचालक विवेक रेड्डी यांनी केली.


कोणत्याही उत्पादनावरील आयएसआय चिह्नाचा गैरवापर कळवा-


बीआयएस प्रमाणन चिन्हाचा गैरवापर हा 'बीआयएस कायदा, २०१६' अन्वये दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा किमान २,००,००० रुपयांचा दण्ड किंवा दोन्ही अशा स्वरूपाच्या शिक्षेस पात्र आहे. अनेकदा असे निदर्शनास आले आहे की, मोठ्या प्रमाणात नफा कमावण्यासाठी आयएसआयच्या बनावट चिह्नाचा वापर करून उत्पादने तयार केली जातात आणि ग्राहकांना विकली जातात. यास्तव, खरेदीपूर्वी त्या वस्तूवरीलआयएसआय चिह्नाची सत्यता पडताळून पाहण्याची विनंती सर्वांना करण्यात येत आहे. यासाठी बीआयएसच्या पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी- http://www.bis.gov.in .


एखाद्या उत्पादनावर आयएसआय चिह्नाचा गैरवापर/बेकायदेशीर वापर होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी ती गोष्ट- 'प्रमुख, MUBO-II, पश्चिम प्रादेशिक कार्यालय, बीआयएस, दुसरा मजला, NTH (WR), भूखंड क्र. F-10, एमआयडीसी, अंधेरी, मुंबई-४०००९३' - येथे कळवावी. तसेच hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर इ-मेल करूनही अशा तक्रारी करता येतील. या माहितीचा स्रोत/ माहिती पुरवणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

Comments
Add Comment

संजय गांधी उद्यानात तीन छाव्यांचे आगमन

कांदिवली: बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली

मुंबईत पश्चिम रेल्वेचा मेगा ब्लॉक

मुंबई : कांदिवली आणि बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे २०/२१

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

बायोकॉन हेल्थकेअर कंपनीकडून ४१५० कोटीची QIP निधी उभारणी

मोहित सोमण: बायोकॉन या जागतिक दर्जाच्या हेल्थकेअर कंपनीने ४१५० रूपयांची गुंतवणूक इक्विटी क्यूआयपी (Qualified Institutional

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण