बंगळुरू/ नवी दिल्ली (हिं.स) : केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी कर्नाटकच्या रस्ते आणि महामार्ग क्षेत्रातील विकास प्रकल्प आणि योजनेवर नवीन माहिती दिली.
ट्वीटरद्वारे नितीन गडकरी म्हणाले,”
Connecting India With Prosperity!
New India of 21st Century is focused on building the best infrastructure facilities in the world.
Keeping it in mind, the project for Six laning of Bengaluru Nidaghatta Section of NH-275 is progressing ahead with lots of promises. pic.twitter.com/nUTqMm86xE
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 19, 2022
जगातील सर्वोत्तम पायाभूत सुविधांच्या उभारणीवर २१व्या शतकातील नूतन भारताचा भर आहे. हे लक्षात घेऊनच राष्ट्रीय महामार्ग २७५ च्या बंगळुरू-निदघट्टा विभागाच्या सहा पदरीकरणाचे काम अनेक आव्हानांसह प्रगतीपथावर आहे.
बंगळुरू ते निदगट्टा हा भाग बंगळुरू दक्षिण विभागातील पंचमुखी मंदिर जंक्शनपासून सुरू होतो आणि निदगट्टाच्या आधी संपतो. हा रस्ता पर्यटन आणि अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा भाग आहे कारण तो बिदाडी, चन्नापटणा, रामनगर या शहरांमधून जातो. या शहरांत आशियातील रेशीम कोशांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. देशातील एकमेव गिधाड अभयारण्यात प्रवेश येथूनच करावा लागतो. हा रस्ता पुढे श्रीरंगपट्टणम, म्हैसूर, उटी, केरळ आणि कूर्गलाही जोडला जाईल.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, सध्याची ३ तासांची प्रवास वेळ ९० मिनिटांपर्यंत कमी होईल. त्यामुळे इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी होईल. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या प्रकल्पात वाहन अंडरपास/ओव्हरपास उपलब्ध करणे यासारख्या रस्ते सुरक्षा सुधारणांसह विशेष काळजी घेण्यात आली आहे. या मार्गावरचे ६ बाह्यवळण रस्ते वाहतुकीची कोंडी कमी करतील. त्यामुळे बिदाडी, रामनगरा, चन्नरायपटना, मद्दूर, मंड्या आणि श्रीरंगपट्टणम सारख्या शहरांचे (एकूण ५१.५ किमी लांबीचा हा पट्टा) आरोग्य, पर्यावरण सुधारेल आणि रस्ते सुरक्षेची ग्वाही मिळेल तसेच अशी अपेक्षा आहे.
‘सबका साथ, सबका विकास’ या वचनाची पूर्तता करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची पथके देशाच्या कानाकोपऱ्यात असे अनेक गतिमान प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि समृद्धी आणण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे.”