अविघटनशील वस्तुंच्या विक्रीवर ठाणे पालिकेची धडक कारवाई

ठाणे (हिं.स): प्लास्टीक बंदी संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये सुमारे ११४ किलो प्लास्टिक जप्त करून ४८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) कायदा २००६ अंतर्गत महाराष्ट्र शासनाद्वारे प्लास्टीक व थर्माकोल इत्यादीपासून बनविलेल्या अविघटनशील वस्तुंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतुक, हाताळणी साठवणुक) वर बंदी घालण्यात आली आहे. तथापि ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सदर बंदी मोडून प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर अकस्मात धडक कारवाई करण्यात आली आहे.


सदर मोहिमेतंर्गत महानगरपालिका क्षेत्रातील ९ प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी अचानक धाडी टाकून प्लास्टीक, थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून एकूण ११४ किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करून ४८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


सदरची कारवाई ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उप आयुक्त मनीष जोशी व आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांच्या नियंत्रणाखाली महापालिकेच्या ९ प्रभाग समितीमधील स्वच्छता निरीक्षक तसेच विभागातील कर्मचारी आदींनी केली.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण आशान

उल्हासनगर : महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत लागलेल्या चढाओढीमध्ये अखेर

नवी मुंबई महापालिकेत ७५० पदांची पोकळी

अनुभवी अधिकाऱ्यांची फळी निवृत्त नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज

सत्तेसाठी नाही, विकासासाठी मनसेचा कौल!

मनसे नेते राजू पाटील यांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट डोंबिवली : कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत भाजप आणि शिंदे

कल्याण-डोंबिवली महापालिकेत ५२ नवीन चेहरे

माजी महापौर-उपमहापौरांना धक्का कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला असून या निकालात

अलिबागचा हापूस मुंबईच्या बाजारात

वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये पहिली पेटी दाखल नवी मुंबई : कोकणच्या मातीतून आलेला आणि चवीसाठी ओळखला जाणारा

कल्याण-डोंबिवलीत सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग; मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता कोणाच्या हाती जाणार, यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. महापालिकेतील