सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला..! नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ट्वीट करत निशाणा साधला आहे. ''सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल तर कौरवांच्या मन मर्जीने राज्य चालते''. सध्याची मुंबईची अवस्था पाहता कुणीही अस्वस्थ होऊ शकतो. गुन्हेगारीचे साम्राज्य, भ्रष्टाचाराची दलाल वाढत वाढत सामान्य मुंबईकरांच्या उंबऱ्यापर्यंत पोहचले आहे. तुम्ही देखील मुंबईचे रहिवाशी असल्याने ढिसाळ कारभाराची राड तुमचा उंबरा एकनाएक दिवस ओलांडणारच होती. झाले ही तसेच असे नितेश राणेंनी म्हटले आहे.


गुरुवारी ९ जूनला तुमच्या निवास्थानाहून हाकेच्या अंतरावर असलेले वांद्रे पश्चिममधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशी बांधकाम कोसळले. १७ जण जीवन मरणाशी लढा देत आहेत. ४० वर्षीय युवकाचा बळी केला. त्या कुटुंबांनी फोडलेल्या टाहोने संबंध मुंबईचे काळाजाचा थरकाप उडाला. आपण मात्र तिथे भेट देऊन विचारपुस करण्याची तसदीही घेतली नाही. तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की त्या निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगलेत असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.


दरम्यान, वर्षभरापूर्वी मालाड मालवणीमध्ये घराचे वाढीव अनधिकृत बांधकाम ढासळून ११ जणांचा बळी गेला. मानखुर्दमध्येही असेच प्रकरण घडले. या जळत्या चितांचा प्रकाश ही तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहचत नाही का? अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कुणाचीही गय करु नका असे आदेश आपण दिलेत मात्र आयुक्त कारवाई करत नाही आहेत. अनधिकृत बांधकामांना दिली जाणारी परवानगी जीवघेणी ठरत आहे.


https://twitter.com/NiteshNRane/status/1537693142329217024

राजकीय आकसापायी विरोधकांना अनधिकृत बांधकामांच्या नोटीसी पाठवण्यात दाखवली जाणारी तत्पर्ता, अनधिकृत बांधकांमांवर हातोडा चालवण्यातही दाखवावी. अन्यथा मुख्यमंत्री जनतेचे नसून ठराविक पक्षांच्या पदाधिकारी नगरसेवकांसाठी आहे की काय? असा संदेश जनमानसात दृढ होईल असाही टोला ट्वीटर द्वारे नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

Comments
Add Comment

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.