एमबीबीएस उत्तीर्ण करणाऱ्यांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य

मुंबई (हिं.स.) : शासकीय आणि महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य करण्यात आली आहे.


सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय आणि महापालिका वैद्यकीय महाविद्यालयांत एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहील. याशिवाय ५ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार शासन अनुदानित/ खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्ती तसेच शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेत असतील अशा विद्यार्थ्यांनाही सामाजिक दायित्व सेवा करणे आवश्यक आहे.


सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून शासन अनुदानित/ खाजगी विनाअनुदानित महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थ्यांनाही सामाजिक दायित्व सेवेची बजावणी अनिवार्य असून दंडाचा भरणा करुन सदर सेवेतून त्यांना सूट प्राप्त करता येणार नाही. सन २०२१-२२ आणि त्यापूर्वीच्या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेशित उमेदवारांना त्या-त्या वेळचे प्रचलित नियम लागू राहतील.

Comments
Add Comment

महापालिकेच्या मुलांना आता चॉकलेटस्वरुपातील एनर्जी बार

पोषक आहारांतर्गत खिचडीसह या एनर्जी बार दिले जाणार मुलांना एनर्जी बारसाठी १४१ कोटी रुपये खर्च केले जाणार

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार