मुंबई (प्रतिनिधी) : अखेर मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महापालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सर्वोच न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांच्या कामाला गती आली आहे. मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी २३ जूनला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या २३ जून २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर १ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ जून २०२२ रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार १७ जून २०२२ रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणार होत्या; परंतु आता सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या २३ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर १ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील.
प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या ९ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…