भाजपकडून 'मिशन ४८' जाहीर

  96

मुंबई : २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणी केली असून 'मिशन ४८' ची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी भाजप तयारी करत आहे. सध्या भाजपच्या ताब्यात नसलेल्या मतदारासंघावर जास्त लक्ष देणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.


२०२४ मध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. ‘लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागा आणि मोदींनी केलेले कार्य जनतेपर्यंत पोहोचवा’ असा संदेश विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुंबईत गुरूवारी यासंदर्भातील बैठक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकींच्या संदर्भात ही बैठक झाल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे. सध्या भाजपच्या ताब्यात नसलेल्या मतदारसंघावर जास्त लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा सामावेश असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले आहे.


फडणवीस म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत लोकसभेसाठी केंद्रातून विनोद तावडे तर राज्यातून चंद्रशेखर बावनकुळे समन्वय साधणार आहे. १६ मतदारसंघांमध्ये जुलै महिन्यात केंद्रीय मंत्र्यांचा प्रवासही होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकानंगले मतदार संघावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पुढील १८ महिन्यात काय करायचे हे नियोजन आखले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.


‘पुढच्या १७ ते १८ महिन्यात लोकसभा निवडणुकांसाठी कसे काम करायचे असे या बैठकीत ठरवण्यात आले आहे. फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आत्तापासूनच जनतेसोबत काम करायचे आहे. राज्यात असलेल्या ४८ पैकी ४८ लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचा प्रयत्न करणार आहोत," असे मत फडणवीस म्हणाले आहेत.


लोकसभा निवडणुकीला दोन वर्ष असताना भाजपचे मिशन महाराष्ट्र सुरू झाले. शिवसेनेकडे असलेल्या १८ लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले काम लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन फडणवीसांनी बैठकीत केले आहे. बारामती, कोल्हापूर, सातारा, मावळ, उस्मानाबाद, औरंगाबाद हिंगोली या लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

जरांगेंच्या आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही मिळाली परवानगी!

मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत लाखोंचा जनसमुदाय घेऊन आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बेमुदत

मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात

बीएमसीकडून आझाद मैदान परिसरात मोर्चेकऱ्यांसाठी निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधा

मुंबई : मराठा समाजबांधवांच्या मागण्यांच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका

शिंदे समिती आणि जरांगेंच्या बैठकीत तोडगा नाहीच

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन करण्यासाठी जमले आहेत. जरांगेंनी आरक्षण

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस मुदतवाढ

मुंबई : महाराष्ट्रातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व

Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा अरक्षणाबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

अहिल्यानगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला