ठाण्यात महिला शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश

Share

ठाणे : भाजपाने मंगळवारी शिवसेनेला पुन्हा जोरदार धक्का दिला. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपशहर संघटक संध्या सुरेश साळुंखे यांच्या नेतृ्त्वाखाली अनेक महिला शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या कार्याला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून पसंती मिळत असल्यामुळे प्रवेशाची मालिका सुरूच असल्याचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी सांगितले.

भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात महिला शिवसैनिकांचे स्वागत करण्यात आले. या वेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी गटनेते मनोहर डुंबरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक सुनेश जोशी, सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे, मनोहर सुखदरे आदींची उपस्थिती होती. या वेळी काही पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या.

भाजपाच्या महिला मोर्चाच्या शहर उपाध्यक्षपदी संध्या साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली. तर माजी नगरसेवक सुधीर बर्गे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, शशिकांत नगीन साळवी व निलेश गोवर्धन भगत यांची चिटणीसपदी, गजेंद्र तोमर यांची कार्यकारिणी सदस्यपदी आणि आयटी सेलच्या संयोजकपदी प्रणय गावकर यांची नियुक्ती करण्यात आली.

Recent Posts

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

57 minutes ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

1 hour ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

1 hour ago

राखी वटवट्या

डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…

2 hours ago

“ठाऊक आहे का तूज काही?”

श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…

2 hours ago

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

2 hours ago