अयोध्या : भाजपासोबत हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन मंदिरासाठी देणगी गोळा केलेली. काहींनी रोख रक्कम देणगी स्वरुपात दिली होती. तर काहींनी चेक स्वरुपात देणगी देणे पसंत केले होते. मात्र चेक दिलेल्या हजारो देणगीदारांपैकी तब्बल दोन हजार देणगीदारांचे चेक बाऊन्स झाल्याने खळबळ उडाली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या अहवालामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राम मंदिरासाठी एकूण ३ हजार ४०० कोटी रुपयांचा निधी गोळा झाला आहे. पण मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या चेक स्वरुपातला निधी हा प्रत्यक्षात मिळालाच नसल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले आहे. दोन हजार चेकच्या माध्यमातून एकूण बावीस कोटी रुपयांची देणगी गोळा करण्यात आली होती. पण चेक बाऊन्स झाल्याने राम मंदिर ट्रस्टला बावीस कोटी रुपयांचा चुना लागल्याची चर्चा आता रंगली आहे.
विशेष म्हणजे राम मंदिराच्या जमीन व्यवहारातही घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता. आप खासदार संजय सिंह यांनी याबाबत आरोप केला होता. राम जन्मभूमी ट्रस्टचे चंपत राय यांनी दोन कोटीची जमीन १८ कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलेला. यावरुही बराच वाद झाला होता. त्यानंतर ट्रस्टच्या वतीने हे आरोप फेटाळण्यात आले होते.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…