ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर सायबर हल्ला

ठाणे (प्रतिनिधी) : जगभरातील मुस्लिमांची माफी मागावी अशी मागणी करत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी ठाणे पोलिसांच्या वेबसाईट वर हल्ला करुन खळबळ माजवली. ठाणे पोलिसांच्या वेबसाईट वर हल्ला झाला असल्याची बातमी मंगळवारी समोर येताच ठाणे पोलीस दलात एकच धावपळ उडाली. हा सायबर हल्ला सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला असल्याची पुर्व प्रार्थमिक माहिती प्राप्त झाली आहे.


सायबर विभागासह गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांची दहा पथके या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सज्ज करण्यात आली असून त्यांनी तपास सूरू केला आहे. दरम्यान वेबसाईट पुर्ववत करण्यासाठीं पोलिस युद्ध पातळीवरील प्रयत्न करत आहेत. वेबसाईट वर ठाणे पोलिसांची माहिती त्याच प्रमाणे अधिकाऱ्यांचे फोन नंबर असून ते गायब झाले आहेत. वेबसाईट वर फक्त सांकेतिक भाषा दिसत आहे. सदरचा प्रकार लक्षात येताच ठाणे पोलिसांनी फॉरेन्सिक लॅब ची मदत घेतली आहे.


मागिल काही दिवसांपासून प्रेषित मोहम्मद पैगंबर अवमान प्रकरणावरून देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावरून भाजपाने नुपूर शर्मा यांना निलंबित केले असले, तरी त्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक महत्त्वाच्या सरकारी आणि खासगी वेबसाईट्सवर हॅकर्सकडून हल्ले केले जात आहेत. त्यात आता ठाणे पोलिसांच्या वेबसाईटचा देखील समावेश झाला आहे. आज ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक करून हॅकर्सनी त्यावर धमकी देणारा संदेश पोस्ट केला आहे.


या प्रकाराची ठाणे पोलिसांकडून तातडीने दखल घेण्यात आली असली, तरी देशातल्या अनेक महत्त्वाच्या वेबसाईट्स या हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर सायबर पोलिसांनी या हॅकर्सचा शोध सुरू केलेला आहे. ‘वन बॅट सायबर टीम- इंडोनेशियन डिफेसर’ असा या हॅकर टीमचे नाव असल्याचे संदेशातून दिसत आहे.


इस्लाम आणि पैंगबर यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या जात आहेत त्या बद्दल सरकारने जगभरातील मुस्लिमांची माफी मागावी अशी हल्लेखोरांची मागणी आहे.

Comments
Add Comment

कल्याण–डोंबिवलीत मंगळवारी पाणीपुरवठा बंद

कल्याण :कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांवरील

‘एमआयएम’च्या नगरसेविका सहर शेखला पोलिसांची नोटीस

मुंब्रा  :महापालिका निवडणुकीत मुंब्रा प्रभाग क्रमांक ३० मधून एमआयएमच्या तिकिटावर विजयी झालेल्या नवनिर्वाचित

बदलापूरमध्ये शाळेच्या बस चालकाकडून चिमुकलीवर अत्याचार

बदलापूर : बदलापूर शहरात पुन्हा एकदा संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या मिनी बस चालकाने ४ वर्षीय

शिवसेनेसोबत मनसेने जाणे मला पटले नाही

ठाणे :कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील राजकीय समीकरणात शिवसेनेला मनसेने पाठिंबा दिल्यामुळे उबाठातून मोठी खळबळ

उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण आशान

उल्हासनगर : महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत लागलेल्या चढाओढीमध्ये अखेर

नवी मुंबई महापालिकेत ७५० पदांची पोकळी

अनुभवी अधिकाऱ्यांची फळी निवृत्त नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज