Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीफडणवीस यांच्यासोबत शेवटपर्यंत प्रामाणिक राहणार - विनायक मेटे

फडणवीस यांच्यासोबत शेवटपर्यंत प्रामाणिक राहणार – विनायक मेटे

आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत

बीड (हिं.स.) : आमची इमानदारीची औलाद असून, बेईमानीची औलाद नाही. एखाद्याला शब्द दिला, हातात हात दिला तर शेवटपर्यंत त्याचा हात सोडत नाही. पाठीत सुरा खुपसणारी आमची औलाद नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आम्ही शब्द दिला आहे की, तुमच्यासोबत कुणी असेल किंवा नसेल, शेवटपर्यंत प्रामाणिकपणे असणार आहे, असे शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांनी म्हटले आहे. दरम्यान आपणच आपल्या हक्काची आमदारकी आता २०२४ ला मिळवायची आहे, असे संकेतही मेटे यांनी यावेळी दिले.

राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीपूर्वीच भाजपामध्ये नाराजी नाट्यावरून मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर मेटे यांनी प्रतिक्रिया दिली. उमेदवारी मिळाली नाही म्हणून बडबडत बसायचे हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मेटे म्हणाले की, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा काही येड्या लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. चांगल्या कामासाठी जाताना काही येडे लोकं आडवी येतच असतात. तसेच उमेदवारी मिळाली नाही म्हणून, नाराज होऊन लगेच बाजूला व्हायचे आणि काहीही बडबडत बसायचे, काहीही करायचं, काहीही उपटसुंभ उद्योग करायचे हे आमच्या बापजाद्यांनी शिकवलं नाही. दरम्यान मित्र जरी असले तरीही कशाला कुणाला काही मागयाचे. त्यामुळे त्या दिशेने आपल्यालाच काम करायचे आहे, असेही मेटे म्हणाले. या माध्यमातून त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -