यंदाचा पहिला ‘सुपरमुन’ आज रात्री दिसणार

मुंबई : यावर्षी एकूण ३ ‘सुपरमून’ दिसणार आहे. त्यापैकी पहिला ‘सुपरमून’ १४ जून रोजी रात्री पौर्णिमेच्या दिवशी दिसणार असल्याची माहिती प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. पृथ्वी-चंद्र हे अंतर नेहमी सरासरी ३ लाख ८५ हजार किलोमीटर असते, परंतु मंगळवार, १४ जून रोजी हे अंतर सरासरी ३ लाख ५७ हजार ४३६ किलोमीटर कमी राहील. त्यामुळे चंद्रचिंच मोठे व प्रकाशमान दिसेल, चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात.


या सुपरमूनला ‘रोझ मून’ हे नाव दिले आहे. यादिवशी चंद्र मोठा दिसेल. चंद्र जास्त तेजस्वी असणार आहे. पृथ्वी आणि चंद्रामध्ये सर्वाधिक कमी अंतर हे २५ नोव्हेंबर २०३५ रोजी असेल. ६ डिसेंबर २०५२ रोजी शतकातील सर्वात मोठा सुपरमून पाहायला मिळेल. पृथ्वीवरून आपल्याला नेहमी चंद्राचा ५९.५ भाग पाहता येतो. चंद्रावरून पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते.


चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेकंद लागतात. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३,७०,००० कि. मी.च्या आत असते, त्याला ‘सुपरमून’ असे म्हणतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ सेंटीमीटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल. चंद्रावर ३० हजार विवरे व १२ पर्वत आहे. पर्वत व विवरे दुर्बिणीमधून अगदी चांगल्याप्रकारे पाहता येतात.


१४ जून रोजी रात्री दिसणारा सुपरमून खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावा. हा सुपरमून अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याचे प्रसिद्ध खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बहुभाषिक चेहऱ्यातही मराठी टक्का भक्कम

मुंबई : महापालिकेच्या निकालाचे आकडे मुंबईच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक समीकरणावर शिक्कामोर्तब करीत आहेत.

‘एमआयएम’चे तेलंगणात ६७, तर महाराष्ट्रात शंभरहून अधिक नगरसेवक…

मुंबई : ‘एमआयएम’ या पक्षाचे आता तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात अधिक नगरसेवक आहेत. तेलंगणामध्ये केवळ ६७ नगरसेवक

मुंबई महापालिकेत महिला नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत!

२२७ प्रभागांमध्ये १३० नगरसेविका विजयी मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण

मुंबईत ८७ हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती

मुंबई महापालिकेत पाचव्या क्रमाकांवर नोटाला मतदान मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा अनेक

महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेतच खरी चुरस!

महापौरांच्या खुर्चीवर पिठासिन अधिकारी म्हणून श्रद्धा जाधव यांच्या नावाची चर्चा मुंबई : महापौरपदाचे आरक्षण

मुंबईच्या महापौरपदाचा ७५ वर्षांचा प्रवास

शहराच्या बदलत्या इतिहासाचे साक्षीदार मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौरपदाचा गेल्या ७५ वर्षांचा प्रवास हा