मुंबई महापालिकेत महिला नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत!

२२७ प्रभागांमध्ये १३० नगरसेविका विजयी


मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असले तरी महापालिकेत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक महिला नगरसेवक निवडून येण्याची परंपरा यंदाही कायम आहे. यंदा मुंबई महापालिकेवर १३० नगरसेविका निवडून आल्या आहेत. २२७ प्रभागांपैकी ११४ प्रभाग महिलांसाठी राखीव असताना यंदा १३० महिला निवडून आल्या आहेत.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यंदाही मोठ्या संख्येने महिला निवडून आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी नियमानुसार ११४ प्रभाग हे महिलांसाठी राखीव होते. या निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांनी खुल्या प्रभागातही महिला उमेदवार दिले होते. त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये महिला उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. २०१२ पासून महापालिकेवर निवडून येणाऱ्या महिलांची संख्या ११४ पेक्षा अधिक असते. तीच परंपरा यंदाही राखली आहे.


मुंबई महापालिकेत यंदा निवडून आलेल्या नगरसेविकांमध्ये सर्वाधिक नगरसेविका या भाजपच्या आहेत. त्याखालोखाल उबाठा गट, शिवसेना यांचे उमेदवार आहेत. भाजपच्या ४९ नगरसेविका निवडून आल्या आहेत. तर उबाठा गटाच्या ३८ नगरसेविका निवडून आल्या आहेत. शिवसेना पक्षाच्या १९ व काँग्रेसच्या ११ आणि मनसेच्या पाच नगरसेविका निवडून आल्या आहेत. एमआयएमच्याही पाच नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या विविध समित्या व विशेष समित्यांमध्येही महिलांना त्याच प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळणार आहे. या महिलांमध्ये मुस्लिम समाजाच्या महिलांचेही प्रमाण लक्षणीय आहे.
मुंबई महापालिकेत यंदा १३० महिला नगरसेवक निवडून आल्या आहेत, तर २०१७ मध्ये १३३ महिला आणि २०१२ मध्ये १२१ महिला निवडून आल्या आहेत. त्यापूर्वी महिला नगरसेवकांची संख्या ८९ इतकी होती. मात्र गेल्या काही वर्षात महिलांनी राजकारणात आपले अस्तित्व निर्माण केले असून अनारक्षित जागांवरही महिला निवडून येऊ लागल्या आहेत.


मुंबई महापालिकेत गेली तीस वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाची महिला आघाडी असून या महिला आघाडीतील अनेक महिला गेल्या पंचवीस वर्षात नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.


कोणाचे किती महिला नगरसेवक?


भाजपचे ८९ नगरसेवकांमध्ये ४९ महिला नगरसेवक, शिवसेना उबाठा गटाचे ६५ नगरसेवकांमध्ये ३८ महिला नगरसेवक, शिवसेनाचे २९ नगरसेवकांमध्ये १९ महिला नगरसेवक, काँग्रेसचे २४ नगरसेवकांमध्ये ११ महिला नगरसेवक, एमआयएम ८ नगरसेवकांमध्ये ५ महिला नगरसेवक, मनसेच्या ६ नगरसेवकांमध्ये ५ महिला नगरसेवकांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या