विलास खानोलकर
नारायण परशुराम सोलापूरकर हे व्यवसायाने वकील होते. श्री स्वामी समर्थ त्यास गणपती म्हणून हाका मारीत. श्री स्वामी समर्थ चरणी त्यांची निष्ठा होती. त्यांना मूळव्याधीचा आजार झाला. पुष्कळ वैद्य-डॉक्टर झाले, पण गुण येईना. एकदा नाइलाजास्तव त्यांनी डॉक्टरांकडून मूळव्याधीचे मोड कापले. त्यामुळे रक्तस्त्राव होऊ लागला. या दुखण्याने ते पूर्वीपेक्षाही अधिक बेजार झाले. दिवसेंदिवस त्यास जास्त अशक्तपणा येऊ लागला. घरातल्या घरातही त्यांना फिरवेना. तेव्हा त्यांनी ही सर्व हकिकत अक्कलकोटात असलेल्या मोरोपंत सेवेकार्यास लिहून कळविली. त्यास श्री स्वामी समर्थ महाराजांस त्यावर औषध विचारावे, असेही लिहिले. त्याप्रमाणे मोरोपंतांनी श्री स्वामींस विचारले असता, रोज थोडे गोमूत्र घ्यावे म्हणजे व्याधी जाईल असे सांगितले. त्याप्रमाणे नारायणरावांनी उपचार करताच ते निखालस बरे झाले. नंतर स्वामींनी स्वप्नात येऊन आशीर्वाद दिला.
स्वामी नारायणाच्या स्वप्नमंदिरी
भव्य कपाळ मुकुटशिरी ।। १।।
कमंडलू त्रिशूळ डमरु करी
गाय मागे उभी हंभरी ।। २।।
स्वामी म्हणे दत्तनाम पवित्र
दत्ताची गाय अति पवित्र ।। ३।।
पोटातील ३३ कोटी देव पवित्र
गोमातेचे गोमुत्रही पवित्र ।। ४।।
घे गोमुत्र मानुनी गंगातीर्थ
सारे शरीर रोगमुक्त पावनतीर्थ ।।५।।
पहाटे आले भरुनी ऊरी
आशीर्वाद दिला उजवा करी।। ६।।
आयुष्यात कमी पडले काही जरी
स्वामीनाम घेता इच्छा होईल पुरी।।७।।
गरिबाला मिळेल आमरस पुरी
विद्यार्थ्याची प्रगती
आकाशा परी।। ८।।
गृहिणीला प्राप्त सुवर्ण अलंकार
निपुत्रीकाला सुंदर पुत्र अलंकार।।९।।
अपंगाला लाभेल शक्ती
विद्वानाला लाभेल युक्ती ।। १०।।
कन्या लाभेल गुणी भ्रतार
शेतकऱ्याचे भरेल
धान्यकोठार ।।११।।
कार्य करता नाम घ्या स्वामी
स्वामींची दृष्टी अति दूरगामी ।।१२।।
श्रीकृष्णार्पण करा सारी कामे
ब्रह्मदेवाचरणी लीन सारी
कामे ।।१३।।
निस्वार्थ बुद्धीने करा काम
दिवसभर गाळा भरपूर घाम ।।१४।।
सारे काम होईल तमाम
कार्यसुगंध पसरेल हमाम ।। १५।।
करा नामाचा प्रचार आजन्म
कीर्ती पसरेल १०० जन्म ।। १६।।
जन्मता आणले नाही काही
जातानाही नेणार नाही काही।। १७।।
गळ्यात तुळशी माळा
मुखी विष्णू नाम बाळा ।। १८।।
कष्टांच्या लागणार नाही कळा
स्वामींनाच आहे तुमचा
कळवळा ।।१९।।
निर्गुण सगुण प्रेमळ स्वामी
भिऊ नको पाठीशी आहेत
स्वामी ।।२०।।