मुंबई (विशेष प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर आता शिवसेनेने येत्या २० तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत असहकाराची भूमिका घेतल्याने काँग्रेसचे धाबे दणाणले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला तर संजय राऊत थोडक्यात बचावले. महाविकास आघाडीला धूळ चारत भारतीय जनता पार्टीने आपला तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांना निवडून आणले. महाविकास आघाडीसोबतच अपक्ष आणि सहयोगी पक्षाच्या आमदारांना गृहीत धरून महाविकास आघाडीने या निवडणुकीतील रणनीती तयार केली होती. यामध्ये ४१ मतांचा कोटा ठरल्याने तीनही उमेदवारांना प्रत्येकी ४२ मते देऊन चौथ्या उमेदवारालाही पहिल्या पसंतीच्या मताने निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा होता. शिवसेनेच्या कोट्यातील सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद केले.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदानच करू शकले नाहीत आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादीने ऐनवेळी आपला कोटा वाढवून घेतल्याने सर्व गणित बिघडले आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. या निवडणुकीत काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना ४४ तर प्रफुल्ल पटेल यांना ४३ मते पडली. ज्या अपक्ष वा लहान पक्षाच्या काही आमदारांनी भाजपाच्या पारड्यात मते टाकली असा शिवसेनेच्या नेत्यांना संशय आहे ते काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे आता शिवसेनेने विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्या सहकारी पक्षांशी असहकार्य करण्याचे ठरविले असल्याचे बोलले जाते. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारांची जबाबदारी घ्यावी, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचे कळते.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होणार आहे. विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपाचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. त्यातच काँग्रेसने मित्रपक्षांच्या मदतीच्या भरवशावर आणखी एक उमेदवार दिला आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचे नेते मात्र चिंतेत पडल्याचे सूत्रांनी सांगितले.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…