वाघांची मान झुकविली रामदास आठवलेंची शिवसेनेवर टिका

  118

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


‘राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला आपली जागा दाखविली आहे. निवडणूक कशी जिंकायची ती फडणवीस यांनी शिकविली आहे. फडणवीस यांनी तिसरी जागा जिंकून बड्या बड्या वाघांची मान झुकविली आहे,’ असे म्हणत रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे.


https://twitter.com/RamdasAthawale/status/1535540254366572544

दरम्यान, राज्यसभेसाठीची सहावी जागा भाजपा आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. या सहाव्या जागेसाठी भाजपाने धनंजय माहडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली होती. कोणत्याही परिस्थितीत ही जागा आम्हीच जिंकू असा दावा भाजपा आणि महाविकास आघाडीकडून केला जात होता.


प्रत्यक्षात मात्र या जागेवर भाजपाचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. छोटे पक्ष तसेच अपक्ष आमदारांनी महाडिक यांना मतदान केले. महाडिक यांना ४१ मते मिळाली तर संजय पवार यांना ३३ मते मिळाली.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई