भाजपाच्या महाडिकांचा 'जय', शिवसेनेच्या पवारांचा 'पराजय'

मुंबई (हिं.स.) : राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाची सरशी झाली असून महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या निकालात भाजपाचे पीयुष गोयल ४८, अनिल बोंडे ४८, काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी ४४, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल ४३ आणि शिवसेनेच्या संजय राऊत ४२ मतांनी विजयी झाले. दरम्यान सहाव्या जागेसाठी भाजपाचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेच्या संजय पवार यांच्यात खरी चुरस होती. मात्र यात अपक्षांच्या मतांवर भाजपाचे धनंजय महाडिक ४१.५ मते मिळून ते विजयी झाले. तर संजय पवार यांना ३३ मते मिळून ते पराभूत झाले. पवार पराभूत झाल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


राज्यसभेच्या सहा जागांसाठी भाजपाने दोन ऐवजी तीन उमेदवार दिल्याने एकूण सात उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत २८५ आमदारांनी मतदान केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना उच्च न्यायालयाने मतदान करण्याची परवानगी नाकारली. तर शिवसेनेचे अंधेरीतील आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे तीन आमदार कमी होते.


नियमानुसार शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर मतमोजणी होऊन निकाल येणे अपेक्षित होते. मात्र महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपाने आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यामुळे आयोगाने मतमोजणीला स्थगिती दिली. त्यानंतर आयोगाच्या स्तरावर बैठकांवर बैठका झाल्या. दरम्यान कॉंग्रेस आणि भाजपाकडूनही आरोप-प्रत्यारोप झाले. या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे तब्बल ९ तासानंतर मतमोजणी सुरू झाली.


मतमोजणीत भाजपाच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा अधिकची मते मिळाल्याने भाजपाचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले. तर शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. पहिल्या फेरीत पवार यांना ३३, महाडिक यांना २७ मते मिळाली होती. मात्र दुसऱ्या पसंतीच्या फेरीत महाडिक यांना ४१.५ मते मिळून त्यांची सरशी झाली. यावरून भाजपाचे १०६ आमदार आहेत. त्या व्यतिरिक्त अधिकची १७ मते आपल्या पारड्यात टाकण्यात भाजपाला यश आल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.


या निवडणुकीत महाविकास आघाडीवर नाराज असलेले काही छोटे पक्ष आणि अपक्षांनी आपली मते भाजपा उमेदवाराच्या पारड्यात टाकली असल्याची चर्चा आहे.

Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल