मुंबई : शाळा आणि कॉलजच्या परिसरात अनेक फेरीवाले असतात. शाळा आणि कॉलजच्या आजुबाजूला असलेले हे फेरीवाले जे खाद्य पदार्थ विकतात ते खाण्यायोग्य नसतात आणि उघड्यावर हे पदार्थ असतात असे पदार्थ खाणे योग्य नाही, शिवाय आता पावसाची सुरूवात होतच आहे आणि अनेक आजार आपले डोके वर का़ढतात अश्यावेळी हे रस्तावरील उघडे पदार्थ आपल्या शरीरास घातक असतात.
त्याशिवाय काही फेरीवाले प्रतिबंधीत वस्तू अवैधरित्या विकतात याचा परिणाम विद्यार्थावर होतो. या सगळ्यावर आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी यंदाचे शालेय वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस उरलेले असताना मुंबईतील शाळा आणि कॉलेज संदर्भात एक चांगला निर्णय घेतला आहे शाळा, कॉलेज परिसरात फेरीवाला बंदी करणे महत्वाचे आहे.
मुंबईतील शाळा आणि कॉलजच्या आजुबाजूला फेरीवाले यांना बसु देऊ नये, जर शाळा आणि कॉलजच्या आजुबाजूला फेरीवाले आढल्यास त्वरीत स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी व्हि़डीओच्या माध्यामातून शाळा आणि कॉलज प्रशासनाला दिली आहे.