कुंटूंब रंगलेय बारावीच्या यशात

सुनील बोडके


वाळुंज (त्र्यंबकेश्वर) : मागील दोन वर्षापासून कोरोनाने शाळा, कॉलेज तसेच ग्रामीण भागात अनेक अडचणीमुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला असताना त्याच ग्रामीण भागातून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे येथील एकाच घरातील देहाडे कुटुंबायांनी मात्र इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.


म्हणतात ना माणूस आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत विद्यार्थी असतो, त्याचप्रमाणे देहाडे कुटूंबातील कुटुंब प्रमुख लक्ष्मण मुरलीधर देहाडे (वय वर्ष ४५) यांनी आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करत इयत्ता १२ वीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला व ६४ टक्के गुण मिळवत तालुक्यात आदर्श घालून दिला आहे, त्याचबरोबर मोठी सून वृत्तिका ६४ टक्के व लहान मुलगा समीर ५५ टक्के गुण मिळवले आहे.


देहाडे कुटुंबियांच्या या यशाने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व शिक्षणा विषयी त्यांची गोडी या बदल अभिनंदन केले, यात तिघांनी मिळून एकत्र अभ्यास, चर्चा करून परीक्षा दिली आणि मोठे यश संपादन केले, यावेळी त्यांना मोलाची साथ दिली ती घरातील अन्य सदस्य मुलगा तुषार लक्ष्मण देहाडे, तसेच पत्नी विमल लक्ष्मण देहाडे यांनी या यशात सर्वांचा मोलाचा वाटा असल्याची लक्ष्मण देहाडे सांगतात.


परिस्थिती मुळे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली कुटुंबियाणी मोलाची साथ देत यशाचा मार्ग सुकर केला, समाजाला शिक्षणा शिवाय पर्याय नाही, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणतात ते उगाच नाही, अजूनही पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे. - लक्ष्मण देहाडे

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या