उत्तर काशीत प्रवासी बस दरीत कोसळली

पन्ना : उत्तरकाशीमध्ये यमुना खोऱ्यात प्रवाशांची बस दरीत कोसळून २२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस सुमारे २०० मीटर खोल दरीत कोसळली आहे. घटनेची माहिती मिळताच 'एसडीआरएफचे' जवान मदतकार्यासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बसमधील प्रवासी हे मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. घटनास्थळी तीन रुग्णवाहिका दाखल झाल्या असून मदतकार्य सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये २८ ते २९ प्रवाशी होते. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफचे जवान मदतकार्यासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. एसपी अर्पण यधुवंशी यांनी सांगितले की, हा अपघात दमतापासून नौगावच्या दिशेने दोन किमी अंतरावर झाला आहे.


बसमधील प्रवासी मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. घटनास्थळी तीन रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. मदतकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये २८ ते २९ जण होते. चार ते पाच जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दरम्यान, या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय इतर सहा जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर एसडीआरएफ, पोलीस आणि इतर प्रशासकीय अधिकारी बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. बस खोलवर दरीत कोसळल्याने मृतदेह काढताना व जखमींना वर आणताना प्रशासनाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे