Saturday, July 13, 2024
Homeदेशउत्तर काशीत प्रवासी बस दरीत कोसळली

उत्तर काशीत प्रवासी बस दरीत कोसळली

२२ प्रवाशांचा मृत्यू

पन्ना : उत्तरकाशीमध्ये यमुना खोऱ्यात प्रवाशांची बस दरीत कोसळून २२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस सुमारे २०० मीटर खोल दरीत कोसळली आहे. घटनेची माहिती मिळताच ‘एसडीआरएफचे’ जवान मदतकार्यासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बसमधील प्रवासी हे मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. घटनास्थळी तीन रुग्णवाहिका दाखल झाल्या असून मदतकार्य सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये २८ ते २९ प्रवाशी होते. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला असून चार ते पाच जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफचे जवान मदतकार्यासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. एसपी अर्पण यधुवंशी यांनी सांगितले की, हा अपघात दमतापासून नौगावच्या दिशेने दोन किमी अंतरावर झाला आहे.

बसमधील प्रवासी मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. घटनास्थळी तीन रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. मदतकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये २८ ते २९ जण होते. चार ते पाच जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय इतर सहा जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर एसडीआरएफ, पोलीस आणि इतर प्रशासकीय अधिकारी बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. बस खोलवर दरीत कोसळल्याने मृतदेह काढताना व जखमींना वर आणताना प्रशासनाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -