नवी दिल्ली (हिं.स) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार ६ जून रोजी सकाळी १०:३० वाजता नवी दिल्ली येथे विज्ञान भवन येथे अर्थ मंत्रालय आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या आठवडाभराच्या भव्य सोहोळ्याचं उद्घाटन करतील. ६ ते ११ जून, २०२२ हा आठवडा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा (AKAM) निमित्त आयोजित कार्यक्रमांचा भाग आहे.
पंतप्रधान यावेळी ‘जन समर्थ पोर्टल’ या सरकारी योजनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करतील. या एकाच डिजिटल संकेतस्थळावर सरकारच्या सर्व अनुदान-आधारित योजना उपलब्ध होतील. लाभार्थ्यांना अनुदान-पुरवठादारांशी थेट जोडणारे हे अशा प्रकारचे हे पहिलेच व्यासपीठ आहे.
विवध क्षेत्रांना मार्गदर्शना द्वारे सोप्या डिजिटल प्रक्रीयेच्या मदतीने योग्य प्रकारचे सरकारी फायदे उपलब्ध करून त्या क्षेत्रांच्या विकासाला प्रोत्साहन देणे हा जन समर्थ पोर्टलचा प्रमुख उद्देश आहे. या पोर्टलवर त्याच्याशी जोडलेल्या सर्व योजनांची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.
या दोन्ही मंत्रालयांच्या गेल्या आठ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणाऱ्या डिजिटल प्रदर्शनाचे पंतप्रधान उद्घाटन करतील. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी १ रुपये, २ रुपये, ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयांच्या नाणी जारी करण्यात येतील.
या वैशिष्ट्यपूर्ण नाण्यांवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (AKAM) या संकल्पनेचा लोगो असेल तसेच ही नाणी दृष्टीहीन व्यक्तींना देखील सहज ओळखता येतील. हा कार्यक्रम देशात ७५ ठिकाणी एकाच वेळी आयोजित केला जाणार असून प्रत्येक ठिकाण डिजिटल माध्यमातून कार्यक्रमाच्या प्रमुख जागेशी जोडले जाणार आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…