अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आहार बनवण्यास नकार

पालघर (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील सुमारे एक हजार २०० अंगणवाडय़ांमध्ये शून्य ते सहा वर्षांच्या लाभार्थी बालकांना आहार तयार करून देण्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिला आहे. आहारासाठी दिले जाणारे पैसे महागाईच्या तुलनेत कमी असल्याचे कारण देत हे काम त्यांनी थांबविले आहे.जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये गरोदर व स्तनदा मातांसाठी अमृत आहार योजना राबवली जात आहे. तर शून्य ते सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना अंगणवाडीमधून गरम ताजे व पौष्टिक आहार शिजवून दिला जातो.


अमृत आहार हा आधीपासूनच अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत दिला जातो. तर गरम ताजा आहारासाठी बचतगट नेमण्यात आले आहेत. अमृत आहार योजनेसाठी ३५ रुपये प्रति लाभार्थी तर गरम ताजा आहारासाठी आठ रुपये प्रति लाभार्थी अनुदान शासनामार्फत दिले जाते. गेल्या काही महिन्यांमध्ये खाद्यतेल, घरगुती गॅस सिलिंडर, किराणा सामान, कडधान्य, तांदूळ अशा जिन्नसांच्या किमती अवास्तव वाढल्या आहेत. त्यामुळे बालकांना आहार पुरवणे बचतगटांना परवडणारे नाही. म्हणून त्यांनी काम थांबवण्याचा निर्णय घेतला, असे सांगण्यात येते. आता या कामाची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे. मात्र त्यांनीही आपली आर्थिक स्थिती आणि महागाईचे कारण देत काम थांबविले आहे. याआधीच अनेक कामांचा अतिरिक्त भार अंगणवाडी सेविकांसह मदतनीसांवर आहे. त्यामुळे काही ठिकाणी हा आहार शिजवून देणे शक्य होत नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते.


एका अंगणवाडीमध्ये किमान वीस लाभार्थी बालकांना गरम ताजा आहार दिला जातो. तर सुमारे पाच ते दहा गरोदर व स्तनदा माता अमृत आहार घेत आहेत. अमृत आहाराचे प्रत्येक लाभार्थी ३५ रुपये व गरम ताजा आहाराचे प्रत्येक लाभार्थी आठ रुपये असे ४३ रुपये एका लाभार्थीमागे खर्च करावे लागतात. या सर्व लाभार्थी मिळून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवसाकाठी पाचशे ते सहाशे रुपये खर्च होतो. सध्या सर्व कडधान्य, खाद्यतेलाचे दर १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. वाढत्या महागाईमुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कमी पैशात आहार शिजवून देणे शक्य नाही. खर्च केल्यानंतर बिल जमा करावे लागते. त्यानंतर त्यांना पैसे मिळतात. आधी सामान आणून खर्च करण्याची त्यांची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना गरम ताजा आहार शिजवून देणे परवडेनासे झाले असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.


अंगणवाडी कर्मचारी वर्गाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याबाबतीत त्यांच्याशी संयुक्त बैठकही लावण्यात आली होती.
- गणेश मांते, प्रभारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास


अंगणवाडी कर्मचारी वर्गावर आधीच अनेक कामांचा बोजा आहे. त्यात गरम ताजा आहार शिजवून देण्यासाठी तगादा लावला जातो. महागाईत हा खर्च परवडणारा नाही. शासन नेहमी अंगणवाडी कर्मचारी वर्गाची चेष्टा करते आहे.
- राजेश सिंग, सचिव, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

Comments
Add Comment

नवी मुंबईत घरगुती ट्युशन क्लासचा स्लॅब कोसळला, एका मुलाचा मृत्यू आणि १० मुले जखमी

कोपरखैरणे : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सेक्टर दोनमधील प्लॉट क्रमांक १२ येथे विद्याभवन अपार्टमेंटमधील

भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी

मुंबईच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर यांचा विजय

मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी १७ प्रभाग समित्यांपैंकी ६ प्रभाग

संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी

मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड

वीर सावकरांना भारतरत्न देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

सुधीर मुनगंटीवार यांच्या अशासकीय ठारावावर मंत्री जयकुमार रावल यांचे उत्तर मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मत्स्यव्यवसाय आणि जल संवर्धन क्षेत्राचा वृद्धीदर ८.४ टक्क्यांवर

मुंबई : महाराष्ट्राच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्रात गेल्या काही वर्षांत अत्यंत सकारात्मक बदल दिसून येत असून,